Thursday, February 27, 2014

एक्स-रे

गोष्ट तरी वर्षभरापूर्वीची असेल. तरू ताप खोकल्याने आजारी होता.
त्याचा एक्स-रे काढायचा होता.नेहमीच्या पध्दतीने रुपालीने त्याला
सगळं नीट समजावून सांगितलं.त्याच्या हजार प्रश्‍नांची शांतपणे उत्तरं
दिल्यावर तो तयार झाला.
‘एक्स-रे’ ची फ़िल्म हातात आल्यावर ती त्याला बघायची होती.
त्यात दिसणार्‍या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यावर थोडा वेळ तो शांत
होता.पण नंतर आश्‍चर्याने म्हणाला,
"आतनं मी असा दिसतो?"