Tuesday, June 9, 2020

birthday special





Updating this blog, which is silent for a long time.
No other day will be more appropriate than this.
Taru is eleven now. It is his birthday today.
Now he plays and enjoys throughout the day with his younger brother, Rutu.
Rutu likes to be with Taru all the time.

Taru reads a lot. Draws excellent pictures. He has many paintings in his collections.
He likes to play many games. Soccer is his favorite one.

He has mastered techniques in Origami. So many excellent Origami models I see nowadays in his study room lying beside storybooks.
He plays the flute. And has acted in nearly six plays to date.

I see a great artist, an actor, and an author in him.

Thursday, October 29, 2015

रस्त्यावर झोपलेला उंदीर


खूप पूर्वी म्हणजे तरू छान बोलू लागलेला तेंव्हाची गोष्ट.
अगदी सक्काळी पुण्यात कारमधून फिरताना तरुला रस्त्यावर
एक उंदीर पडलेला दिसला.तो अर्थात जिवंत नव्हता.
त्यावेळी तरुला जगणं मरणं
हे काही माहितच नव्हतं.

‘बाबा,उंदीर.’तरुने दाखवलं.
‘हो’
‘बाबा,तो काय करतोय तिथं?’
राहुलला अचानक काय बोलावं ते कळेना.
गाडी वेगाने पुढे नेत तो म्हणालेला,
‘झोप लागली वाटतं त्याची.’

घरी येईपर्यंत तो त्याच गोष्टीचा विचार करीत होता.
आणि मग दिवसभर काय काय विचारीत राहिला.

‘असा कसा रस्त्यावर झोपला?
त्याचं घर कुठे आहे?
मग कधी उठेल तो?
त्याला गाडीच्या आवाजाने जाग कशी येत नाही?
त्याची आई कुठे आहे?
.........
तरुचे प्रश्‍न संपतच नव्हते.


गेल्या वर्षी तरू मला सांगत होता,
‘आजोबा,मला माहिताय,
देवाघरी जाणं म्हणजे काय असतं.’
तरू आता पाच वर्षांचा होता.
‘ते असं म्हणतात फक्त.म्हणजे कोणी
मरतं तेंव्हा, तो देवाच्या घरी जातो.
खरं म्हणजे तो परत कधीच येवू शकत नाही मग.’
त्याला ते माहितच होतं. तो मला सांगत होता.
विचारत नव्हता.


Monday, September 22, 2014

माझे आभाळ तुला घे

त्या दिवशी रुपाली गाणं गुणगुणत होती,
"माझे आभाळ तुला घे,
तुझे आभाळ मला.
आठवाच्या पारुंबीला
बांधू
 एक झुला...."
‘टिंग्या’ चित्रपटातलं हे गाणं
आमच्या सगळ्‍यांच्याच
खूप आवडीचं आहे.

हल्ली तरू खूप छानच चित्रं काढत असतो.
दिसेल ते ते,आठवेल ते ते चित्रात मांडत राहतो.

त्याने अचानक एक चित्र रुपालीच्या पुढे
धरलं आणि म्हणाला,
तू म्हणत होतीस त्या गाण्याचं चित्र !

त्याच्या या झटपट चित्राची आम्हाला
खूपच मज्जा वाटली.

Monday, June 9, 2014

तरुचा वाढदिवस !

आभाळात काळे काळे ढग दिसू लागले.काळेभोर पाणीदार डोळे जणू.करुणेचा तो क्षण .
आता कधीही वृष्टी होईल,असं वाटत रहातं.मृगाची तृष्णा आणखीच वाढवणारं
पण फसवं मृगजळ नाही तर खरंखुरं पाणी...जीवन आता बरसणार आहे.
तरुच्या जन्मानंतर काही तासातच त्याला मांडीवर घेवून शांतपणे हे असेच
ढग बघत बसलो होतो.पाच वर्षापूर्वी !

जूनची सात तारीख..ओलांडून झाली. आज नऊ जून.
पाऊस येणार..येणार !
आशेची पालवी जागी करणारी ही नऊ तारीख...
आज वाढदिवस तरुचा !
खूप खूप शुभेच्छा !


Wednesday, April 23, 2014

when we sleep...

This post totally belongs to Taru.
He likes to make his own flag to salute. That is his idea of creativity!

Today he conceived some idea.He brought his idea on paper.
Has done an excellent illustration and explained it to us in his own words and his own handwriting..
I have just highlighted the image for you.I have no words to praise him enough..but a salute!

Monday, March 31, 2014

Superheroes !

"Yesterday when we were listening to Bhavsaragam in auditorium, Pt. Hridaynath started an abhang by Dnyneshwar and stopped for talking about him and other Sant.  
Taru : Aaee, what is Sant?
Me: good men, in early days in India, wrote Abhang, helped people
Taru : Abhang is Kavita right?
Me: yes
Taru : I think "Sant" were " Superheroes" in earlier time ! because they helped people ... do you think so Aaee?
Me: I agree"
This dialogue was narrated by Rupali just few days back to me.

Sunday, March 2, 2014

नर्सरी

शब्दांच्या अर्थाचा धांडोळा घेण्याची सवय फार लहाणपणीच
तरुला लागली.एखाद्या शब्दाचा अर्थ समजेपर्यंत
तो पाऊलच पुढे टाकत नाही असं म्हटलं तरी चालेल.
पूर्वी तो ‘म्हणजे?’ असा प्रश्‍न करायचा.
आताशा तो अंदाज करू लागलाय.
शिरगावात आणि पुण्यातही आम्ही त्याला घेवून
खूप सार्‍या नर्सरींमध्ये गेलो आहोत.
त्याने तिथलं काम जवळून बघितलेलं आहे.
तिथनं त्याच्या आवडीची झाडं घरी आणलेली आहेत.
झाडांना पाणी घालणं हा तर त्याचा अत्यंत आवडीचा
उद्योग आहे.
अलिकडेच एका नर्सरी जवळून जाताना,
तो रुपालीला आणि राहुलला  सांगत होता,
"मला वाटतं या दुकानाला ‘नर्सरी’
का म्हणत असतील माहिताय,
इथं झाडांची, नर्स पेशंटची घेते तशी
काळजी घेतात ना म्हणून!"
त्याची ‘री’ ओढण्याशिवाय दुसरं काही उत्तर
आहे तुमच्याकडे?
नर्सरी!