Sunday, March 2, 2014

नर्सरी

शब्दांच्या अर्थाचा धांडोळा घेण्याची सवय फार लहाणपणीच
तरुला लागली.एखाद्या शब्दाचा अर्थ समजेपर्यंत
तो पाऊलच पुढे टाकत नाही असं म्हटलं तरी चालेल.
पूर्वी तो ‘म्हणजे?’ असा प्रश्‍न करायचा.
आताशा तो अंदाज करू लागलाय.
शिरगावात आणि पुण्यातही आम्ही त्याला घेवून
खूप सार्‍या नर्सरींमध्ये गेलो आहोत.
त्याने तिथलं काम जवळून बघितलेलं आहे.
तिथनं त्याच्या आवडीची झाडं घरी आणलेली आहेत.
झाडांना पाणी घालणं हा तर त्याचा अत्यंत आवडीचा
उद्योग आहे.
अलिकडेच एका नर्सरी जवळून जाताना,
तो रुपालीला आणि राहुलला  सांगत होता,
"मला वाटतं या दुकानाला ‘नर्सरी’
का म्हणत असतील माहिताय,
इथं झाडांची, नर्स पेशंटची घेते तशी
काळजी घेतात ना म्हणून!"
त्याची ‘री’ ओढण्याशिवाय दुसरं काही उत्तर
आहे तुमच्याकडे?
नर्सरी!


No comments:

Post a Comment