Thursday, December 9, 2010

तरुला शाळेत जायचंय..





तरू आज दिड वर्षाचा झाला.
गेल्या दोन महिन्यात
तो एवढं काय काय बोलतोय,
खूपच मजा येतेय त्याला ऐकताना.
एक म्हणजे
त्याला किती कळतंय ते समजतंय त्यामुळं.
आणि दुसरं म्हणजे
त्याच्याशी चक्क गप्पा मारता येवू लागल्यायत.
हल्ली तो स्वत:ला मी म्हणायच्या ऐवजी
तरू म्हणून वाक्य बनवत असतो.
म्हणजे,"तरुला झोपायचंय",
"तरुला शाळेत जायचंय " वगैरे.
सगळी मुलं दप्तर घेवून शाळेत जातात,
दप्तरात पुस्तकं असतात,
हे त्याला चांगलं माहित आहे.
बाहेर गेल्यावर शाळा दिसताच
त्याची मागणी सुरू होते.
त्याला आणि खरोखरच
वाचायचं असतं भरपूर.
कुठल्या पुस्तकात काय काय आहे
हे त्याला माहित आहे!
भिंतीवर काढलेल्या आंब्याच्या झाडाजवळ जावून ,
हातात पुस्तक घेवून बसतो
आणि म्हणतो,
"तरू झाडाखाली पुस्तक वाचतोय."

2 comments:

  1. आंब्याचं झाड....फार आवडतं मला आंब्याचं झाड. त्याच्याकडे बघत मी कितीही वेळ बसून राहू शकतो. माझ्या जीवनातील मधूर भावलतांनी आम्रवृक्षाला लपेटलंय... आंब्याची शितलता,विशालता,त्याचा पिवळाजर्द मोहोर...गावाबाहेरच्या विहिरीवर मोहरलेला आम्रवृक्ष मी पाहिलाय. त्या विहिरीतून पाणी शेंदून एका हातात लोखंडी बादली आणि डोक्यावर कळशी घेऊन जाणारी मुलगी मी बघीतलीय... आंब्याचं झाड आणि डोक्यावर कळशी घेऊन जाणारी ती ग्रामबाला जेव्हा माझ्या डोळ्यांपुढे येतात तेव्हा जीवनात असणारे श्रम आणि सौंदर्य,दु:ख आणि माधुर्य, वेदना आणि चेतना यांचं मला स्मरण होतं....

    आजोबा, तुमच्या तरुसाठी.

    तेजेश.

    ReplyDelete
  2. तेजेश,
    अगदी एका झाडाखाली बसलो आहोत असं वाटलं बघ.
    तुझ्याशी गप्पा करायला मजा येणार गड्या!

    ReplyDelete