Friday, November 19, 2010

रोज सवेरे एक टमाटर ..




माहित नाही का पण
टोमॅटो तरुला खूपच आवडतं.
लाल आकर्षक रंगामुळे
स्वयंपाक-गृहात
पहिलं लक्ष टोमॅटोकडे जातंच.
बाजारातही हिरव्या भाज्यांमध्ये
टोमॅटोच मॉनिटर.

स्वच्छ धुतलेल्या टोमॅटोला
एक छोटसं दार करून दिलं की
आंब्याएवढ्याच आवडीने
तरू टोमॅटो संपवतो.

हल्ली आईबरोबर बाजारात गेल्यावर
पहिली उडी टोमॅटोवरच पडते मग.

आईने तरूची आवड बघून
गॅलरीत लावलं टोमॅटोच झाड!
सांगत राहिली आणि,
"तरुली, हे कसलं झाड माहितै का,
टोमॅटोचं!"
तरू रोज बघत होता
झाड मोठं होताना.
झाड लवकरच मोठं झालं.
त्याला फुलं आली.
आणि टोमॅटोपण आली.
पण ती होती
सगळी हिरवी हिरवी.
तरुला नक्कीच प्रश्‍न पडला असणार,
‘असं कसं,हे कुठं टोमॅटो आहे?’
आईला ठाऊकच होतं ते.
ती सारखी तरुला सांगायची,
"तरुली,मोठी झाली की
टोमॅटो सगळी लाल लाल होणार.
मग ती तरुला खायला मिळणार."

एके दिवशी,
खरंच मिळालं की
झाडावरचं टोमॅटो,
तरुला.

अशा प्रकारच्या किती तरी गमती सांगायच्यायत.
तुम्ही ऐकताय ना?

1 comment:

  1. राजेंद्रजी, तुमचं तरुरारु खरंच फार आवडलं. त्यातला साधेपणा आणि खरेपणा भावला. आज काहिसं निराश होऊन उगीच इकडेतिकडे सर्च करताना तुमचं लिखाण वाचलं आणि....बरं वाटलं.

    thanks!

    ReplyDelete