कसं कळतं मुलांना रोज नवं नवं काही
न शिकवता कुणी मुद्दाम ?
त्यांचं संशोधन सुरुच असतं दर क्षणाला.
किती अभ्यास करतात मुलं
दिसलेल्या प्रत्येक गोष्टीचा!
त्यांच्या नजरेतून नाहीच सुटू शकत काही.
वार्याने उडणारी पानं बघून
एक पान
वार्यात धरून उडवण्याचा प्रयत्न करणार्या
तरूला बघून मला फारच मजा वाटलेली.
ऊन आणि सावलीचा अभ्यास करत तो
पुन्हा पुन्हा ऊन्हात जावून पायाला चटका बसला की
पुन्हा सावलीच्या आश्रयाला येत
‘हे असं काय होतंय?’
असा चेहेरा करत होता.
आणि ते बघून आम्हाला त्याच्या मनातलं ऊन स्पष्ट दिसत होतं.
मुलांना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तेवढी शांतता आणि संधी मात्र मिळायला हवी. नाही?
No comments:
Post a Comment