
या नऊ जूनला तरू दोन वर्षाचा झाला.
तरुच्या जन्मादिवशीचं आभाळ असंच सावळ्या मेघांनी भरलेलं होतं.
आणि आम्ही सगळे तरुच्या दर्शनाने भारलेले होतो!
तरुला मांडीवर घेऊन
वार्यावर झेपावणार्या ढगांकडे बघताना
आम्हाला अनेक बाष्प-शिल्पं दिसत होती.
मातीचा सुगंध हवेत हलकेच हेलकावत होता.
माझ्या जवळ नेहमीप्रमाणे कोर्या पानांची वही वाट बघत होती..
नव्या चित्राची.
प्रत्येक ‘मृगाचा पाऊस’ असेल तरुचा वाढदिवस.
प्रेमाचा मृद्गंध आणि सुखाची आरास!!
No comments:
Post a Comment